मुंबई -सचिन तेंडुलकर आगामी लिजेंड्स लीग क्रिकेटचा (LLC) भाग नसल्याचे SRT स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने शनिवारी स्पष्ट केले.
एएलसी ही ( Legends League Cricket ) एक निवृत्त खेळाडूंसाठी क्रिकेट लीग आहे. त्यांनी अलीकडेच या लीगसाठी आपला भारतीय संघ जाहीर केला आहे. नुकताच या लीगचा प्रमोशनल व्हीडीयो प्रदर्शित झाला आहे. यात अभिनेता अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर देखील या लीगचा एक भाग होणार आहे, असल्याचे दाखवले आहे. मात्र, याला जो SRT स्पोर्ट्सने नाकार दिला आहे.
सचिन LLC मध्ये सहभागी होणार नाही
सचिन तेंडुलकरच्या 'लेजेंड्स लीग क्रिकेट' मध्ये सहभागी झाल्याची बातमी खरी नाही. आयोजकांनी क्रिकेट चाहत्यांची आणि अमिताभ बच्चन यांची दिशाभूल करण्यापासून परावृत्त केले पाहिजे," असे SRT स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रा.चे अधिकृत प्रवक्ते म्हणाले.