नवी दिल्ली: भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर (India's greatest cricketer Sachin Tendulkar) यांनी रविवारी टेनिस स्पर्धेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. भारताचे माजी खेळाडू सचिन तेंडूलकर म्हणाले, महाराष्ट्र ओपन ही सर्व भारतीय खेळाडूंसाठी उत्तम संधी असणार आहे. यंदा चौथ्या पर्वातील ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथे 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत रंगणार आहे.
Maharashtra Open: महाराष्ट्र ओपन ही सर्व भारतीय खेळाडूंसाठी उत्तम संधी असणार आहे - सचिन तेंडूलकर - मास्टर ब्लास्टर सचिना तेंडुलकर
भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Cricketer Sachin Tendulkar) यांनी आपल्या ट्विटर अकांऊंटवरून महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
![Maharashtra Open: महाराष्ट्र ओपन ही सर्व भारतीय खेळाडूंसाठी उत्तम संधी असणार आहे - सचिन तेंडूलकर Sachin Tendulkar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14321364-270-14321364-1643527915058.jpg)
टाटा ग्रुप प्रायोजित आणि महाराष्ट्र लॉन टेनिस संघटना (Maharashtra Lawn Tennis Association)(एमएसएलटीए)च्या वतीने आयोजित दक्षिण आशियातील एकमेव 250 स्पर्धा असलेल्या या स्पर्धेत सलग चौथ्या वर्षी रामकुमार सहभागी होत आहे. या स्पर्धेबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी ट्विट करत म्हणले आहे की, 'एक टेनिस प्रेमी म्हणून, मला माहित आहे की माझ्यासारखे अनेकजण आगामी महाराष्ट्र ओपन साठी उत्सुक असतील. सर्व भारतीय खेळाडूंना आणि टेनिस प्रेमींसाठी भारतातील ATP 250 स्पर्धा (ATP 250 competition in India) पाहण्याची ही एक उत्तम संधी असेल. सर्व सहभागींना माझ्या हार्दिक शुभेच्छा!'