मुंबई : महिला प्रीमियर लीग 2023 चा 19 वा सामना आज मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. आरसीबी प्लेऑफमधून बाहेर आहे. मुंबई इंडियन्ससाठी पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळवण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्स 7 पैकी 5 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. RCB 7 सामन्यांपैकी 2 विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रथम फलंदाजी करताना :प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने मुंबई इंडियन्सला 126 धावांचे टार्गेट दिले आहे. आरसीबीने 20 षटकांत 9 विकेट गमावून 125 धावा केल्या. मुंबई इंडियन्सला आता 126 धावा कराव्या लागणार आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला डाव :प्रथम फलंदाजी करताना आरसीबीकडून स्मृती मंधाना आणि एस डेव्हिनने डावाची सुरुवात केली. आज स्मृतीने 25 चेंडूत 24 धावा केल्या असल्या तरी स्मृतीला चांगली कामगिरी करता आली नाही. तिच्या बरोबर आलेल्या एस डेव्हीनला खातेसुद्धा उघडता आले नाही. त्यानंतर आलेल्या एलिस पेरीने 38 चेंडूत 29 धावा करून संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. त्याचबरोबर एच नाईट 13 चेंडूत 12 धावा करून तंबूत परतली. कानिका अहुजा हिने 13 चेंडूत 12 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या रिचा घोषने आक्रमक खेळी करीत 13 चेंडूत 29 धावा करून संघाची धावसंख्या वाढवली.