महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

RCB Head Coach : आरसीबीला मिळाले नवे हेड कोच, बांगर-हसन जोडीची हकालपट्टी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने IPL 2024 च्या आधी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवरची नियुक्ती केली. अँडी फ्लॉवर यांनी या आधी लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

RCB Head Coach
आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक

By

Published : Aug 4, 2023, 9:24 PM IST

बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलच्या पुढील हंगामासाठी अँडी फ्लॉवरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. फ्लॉवर संजय बांगरची जागा घेतील, जे 2023 पर्यंत आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक होते. यासह आरसीबीने टीमचे संचालक माईक हसन यांनाही पदावरून हटवले आहे.

'फाफसोबत काम करण्यास उत्सुक' : 'माईक हसन आणि संजय बांगर यांनी केलेल्या कामाची मी प्रशंसा करतो. या दोन प्रशिक्षकांचा मी आदर करतो. मी आरसीबीला नव्या उंचीवर नेण्याचे आव्हान पेलण्याची वाट पाहत आहे', असे अँडी फ्लॉवर मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्यावर म्हणाले. 'कर्णधार फाफसोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी मी उत्साहित आहे. आम्ही भूतकाळात एकत्र चांगले काम केले आहे', असे ते म्हणाले. 'आमच्या संघात चांगले खेळाडू आहेत. हे एक मोठे आव्हान आहे आणि मी ते सुरू करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही', असे फ्लॉवर म्हणाले.

क्रीडा प्रशिक्षणाच्या क्षेत्रात अँडी फ्लॉवर मोठे नाव : अँडी फ्लॉवर यांनी या आधी लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांनी आयपीएल 2022 आणि 2023 मध्ये लखनऊ संघाला प्लेऑफमध्ये नेले होते. त्यांच्या जागी ऑस्ट्रेलियाचे माजी मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रीडा प्रशिक्षणाच्या क्षेत्रात अँडी फ्लॉवर हे मोठे नाव आहे. इंग्लडने त्यांच्या प्रशिक्षणाखाली 2009 आणि 2013 मध्ये घरच्या मैदानावर अ‍ॅशेस मालिका जिंकली होती. महत्त्वाचे म्हणजे 2010-11 मध्ये त्यांनी इंग्लंडला ऑस्ट्रेलियात अ‍ॅशेस जिंकून दिले होते. 2010 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचे ते मुख्य प्रशिक्षक होते.

अनेक स्पर्धांमध्ये संघाला विजेतपद पटकावून दिले : 2014 मध्ये ते इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार झाले. त्यानंतर आयपीएलमध्ये लखनऊ फ्रँचायझीची कमान सांभाळण्यापूर्वी त्यांनी दोन हंगामांसाठी पंजाब किंग्जसाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यांनी गेल्या वर्षी द हंड्रेड टूर्नामेंटमध्ये ट्रेंट रॉकेट्सला विजेतेपद मिळवून दिले. तसेच गल्फ जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून युएइच्या IL T20 स्पर्धेत विजय मिळवून दिला. आणि या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी मुलतान सुलतान्सला पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये विजय मिळवून दिला होता.

हेही वाचा :

  1. BCCI Media Rights : टीम इंडियाचे सामने कोणत्या चॅनलवर दिसणार? बीसीसीआयने काढले टेंडर
  2. Jasprit Bumrah : अखेर प्रतीक्षा संपली!, जसप्रीत बुमराहचे टीम इंडियात धडाक्यात पुनरागमन
  3. Stuart Broad Retirement : युवराज सिंगने 6 षटकार ठोकलेल्या गोलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, युवी म्हणाला..

ABOUT THE AUTHOR

...view details