हैदराबाद - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस आता आरसीबीची कमान संभाळणार ( Faf du Plessis RCB Captain ) आहे. विराट कोहलीने 2021 साली आपले कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर आरसीबीचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचे उत्तर आज विराट कोहलीने दिले ( Virat Kohli Announce RBC New Captain ) आहे.
फाफ डू प्लेसिस संघाचा नवीन कर्णधार होणार असल्याची माहिती खुद्द विराट कोहलीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे. आरसीबीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने विराटचा एक व्हिडिओ टाकला आहे. त्यात बोलताना विराट म्हणाला की, 'नव्या हंगामाची सुरुवात होणार आहे. आम्ही नव्या जोमाने आणि उर्जेने नवीन हंगामात उतरु. त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की फाफ संघाचा नवीन कर्णधार असेल,' असे विराटने म्हटले आहे.