हैमिल्टन:न्यूझीलंडचा प्रमुख फलंदाज रॉस टेलरने ( Batsman Ross Taylor ) सोमवारी नेदरलँड्सविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडकडून शेवटचा सामना खेळला. ज्यामध्ये त्याने 14 धावा केल्या, त्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून या महान खेळाडूला अभिवादन केले.टेलरचा हा न्यूझीलंडसाठी 450 वा आणि शेवटचा सामना होता, ज्याने त्याच्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा ( 16 years of international career ) शेवटही केला.
राष्ट्रगीत सुरू असताना टेलर झाला होता भावूक -38 वर्षीय फलंदाजाने या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पण त्याच्या घरच्या मैदानावर सेडन पार्कवर शेवटचा सामना खेळून त्याला क्रिकेटला अलविदा करायचा ( Taylor says goodbye to cricket ) होता. राष्ट्रगीत सुरू असताना टेलरची मुले मॅकेन्झी, जॉन्टी आणि अॅडलेड त्यांच्या बाजूला उभे होते. तेव्हा तो भावूक झाला होता. जेव्हा तो मैदानात उतरला आणि परतला तेव्हा नेदरलँडच्या खेळाडूंनी त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून त्याचा सन्मान केला.
टेलर अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू -रॉस टेलरने 2006 साली न्यूझीलंडसाठी ( Debut for New Zealand in 2006 ) आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्याचबरोबर त्याने आपला पहिला कसोटी सामना त्याच्या पुढच्या वर्षी खेळला होता. त्याने 112 कसोटी सामन्यांमध्ये 19 शतकांच्या मदतीने 7,683 धावा केल्या. टेलरने 236 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8,593 धावा आणि 102 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1,909 धावा केल्या आहेत. तीनही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा टेलर हा जगातील एकमेव खेळाडू आहे.
शेवटच्या सामन्यात त्याला क्रीजवर येण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. मार्टिन गप्टिल आणि विल यंग यांच्या दुसऱ्या विकेटसाठी 203 धावांच्या भागीदारीमुळे त्याला 39व्या षटकात क्रीझवर यावे लागले. मैदानावर त्याचे आगमन होताच, प्रेक्षकांनी उभे राहून त्याचे स्वागत केले ( Taylor's welcome from the audience ). तो या सामन्यात 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य होते. तो नेदरलँडच्या खेळाडूंमधून बाहेर पडला आणि मैदानाबाहेर गेला. दरम्यान, उपस्थितांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. टेलरने नंतर रेडिओ न्यूझीलंडला सांगितले की, मी नेहमी परिस्थितीनुसार आणि चेहऱ्यावर हसू घेऊन खेळलो. मी माझ्या देशाचे पूर्ण अभिमानाने आणि सन्मानाने प्रतिनिधित्व केले. मला सुरुवातीपासूनच देशासाठी खेळायचे होते.
हेही वाचा -Ipl 2022: सीएसकेच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार जडेजाने दिली प्रतिक्रिया; म्हणाला...