नॉटिंगहॅम:मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघासाठी एक नवीन आशा म्हणून उदयास आला आहे. सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav ) रविवारी नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 117 धावांची शानदार खेळी खेळली. टीम इंडियाने भलेही हा सामना 17धावांनी गमावला असेल, पण सूर्याने आपल्या खेळीने भारतीय चाहत्यांची मनं नक्कीच जिंकली. त्याचबरोबर त्याने अनेक विक्रम सुद्ध प्रस्थापित केले आहे. तसेच सूर्यकुमार यादव बाबतचे रोहित शर्माचे 10 वर्षापूर्वीचे एक ट्विट आता जोरदार व्हायरल ( Rohit Sharma tweet goes viral ) होत आहे.
सूर्यकुमार यादवच्या टी-20 शतकानंतर ( Suryakumar Yadav T20 Cricket century ) भारताचा कर्णधार रोहित शर्माचे 10 वर्ष जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 10 डिसेंबर 2011 रोजी रोहितने एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, ''चेन्नईतील बीसीसीआय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. काही महान क्रिकेटपटू येत आहेत. मुंबईचा सूर्यकुमार यादवही भविष्यात कमाल करू शकतो.'' यावरून रोहितला सूर्यकुमार यादवच्या प्रतिभेची चांगलीच ओळख असल्याचे दिसून येते.