नवी दिल्ली: भारतीय मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी-20 मालिकेत पुनरागमन करणार आहे. तो या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. या अगोदरच आता रोहित शर्मा चर्चेत आला आहे. याचे कारण आहे त्याने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट. रोहित शर्माने आपली पत्नी रितीका सोबत एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
34 वर्षीय रोहित शर्मा आपली पत्नी रितिका सोबत या फोटोत हसताना दिसत आहे. ही पोस्ट रोहित शर्माच्या चाहत्यांना खुप आवडली (Fans liked Rohit Sharma's post) आहे. तसेच या पोस्टवर त्याचे चाहते लायक्स आणि कमेंट्सचा भडीमार करत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये रोहित शर्माने लिहिले आहे की, माझे घर.
दरम्यान रोहित शर्मा हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेला रोहित शर्मा मुकला होता. तसेच आता वेस्टइंडीज संघ भारत दौऱ्यावर (West Indies tour of India) येत आहेत. ज्यामध्ये वनडे आणि टी-20 मालिकेचा समावेश आहे. ज्यामध्ये भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे.
भारत विरुद्ध वेस्टइंडीज संघात 6 फेब्रुवारी पासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. तसेच या दोन संघातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला त्यानंतर सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी बीसीसीआयने वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा (BCCI announces ODI and T20 squads) केली आहे.