कोलकाता - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( India v West Indies ) संघात टी-20 मालिकेतील पहिला सामना बुधवारी खेळला गेला. हा सामना कोलकात्यातील ईडन्स गार्डनवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर 6 गडी राखून मात ( India beat West Indies 6 wickets ) केली. या सामन्यात रोहित शर्माने मैदानावर उतरताच एक नवीन विक्रम आपल्या नावी केला आहे.
मर्यादीत षटकातील भारतीय संघाचा नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माचा ( Regular captain Rohit Sharma ) हा पहिलाच टी-20 सामना होता. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याच्या नाणेफेकीसाठी येताच रोहित शर्माने आपल्या नावी एक विक्रमाची नोंद केली.
रोहित शर्मा मैदानावरच उतरताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसर्या स्थानी आला आहे. रोहित शर्माचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 120 वा टी-20 सामना होता. अशी कामगिरी करणारा तो भारतीय संघाचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी२० सामने (Most T20 matches in international cricket ) खेळणाऱ्याच्या यादीत पाकिस्तानचा शोएब मलिक हा अव्वस्थानी आहे. त्याने 124 आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हफिज तिसऱ्या स्थानी आहे. त्याने 119 आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.
बुधवारी झालेल्या टी-20 सामन्यात वेस्ट संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 7 बाद 157 धावा केल्या. ज्यामध्ये निकोलस पूरनने सर्वाधिक धावा करताना 61 धावांचे योगदान दिले होते. त्यामुळे वेस्ट इंडिज संघ दीडशे धावांचा टप्पा पार करु शकला. प्रत्युतरात भारताने 158 धावांचे आव्हान 18.5 षटकांत 4 गडी गमावून 162 धावा करत पूर्ण केले. भारताकडून सर्वाधिक धावा कर्णधार रोहित शर्माने ( Captain Rohit Sharma ) केल्या.
हेही वाचा :IND vs WI 1st T-20 : वेस्ट इंडिज विरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा भारत तिसराच संघ