लंडन : ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने 111 धावांचे लक्ष्य सहज गाठले. पण लॉर्ड्सवरील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लिश परिस्थितीत 247 धावांचा पाठलाग करताना भारतीय टॉप ऑर्डरला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खेळपट्टीने इंग्लंडच्या गोलंदाजांना मदत केल्याने, रीस टोपलीने भारतीय आघाडीच्या फळीवर आक्रमन केले. त्यामुळे भारताला 100 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रोहित शर्माने प्रतिक्रिया ( Rohit Sharma Statement ) दिली.
सामन्यानंतर, रोहित शर्माने 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि 2019 एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीचा उल्लेख केला आणि फलंदाजांना त्यांची मानसिकता बदलण्याचे आणि गुरुवारसारखे पराभव टाळण्यासाठी सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले. शर्माने फलंदाजांच्या आक्रमक वृत्तीबद्दल सांगितले, जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेपासून ते T20 मध्ये करत आहेत.
...तर फलंदाजांचा आत्मविश्वास वाढेल -
तो म्हणाला, मला वाटतं, हो तुम्ही पाठलाग करू शकतो. जोपर्यंत तुम्ही नीट विचार केला नाही तोपर्यंत ते करणे कठीण होईल. कारण आम्ही अनेक प्रसंगी 20 किंवा 30 धावांच्या आत 3-4 विकेट गमावत आहोत. तो पुढे म्हणाला, "पण अशा परिस्थितीत या खेळाडूंनी सामना पुढे नेला पाहिजे आणि संघाच्या ध्येयाकडे पाहण्यापेक्षा ते त्यांच्या खेळाबद्दल काहीतरी वेगळे शिकू शकतात का ते पहावे अशी आमची ( Rohit Sharma angry with batsmen ) इच्छा आहे." मला वाटते की ते संघाला त्या परिस्थितीतून बाहेर काढू शकले तर त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.