पुणे :महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बुधवारी झालेल्या आयपीएल 2022 (IPL 2022 ) च्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने, पॅट कमिन्सच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला. हा मुंबई इंडियन्स संघााचा यंदाच्या स्पर्धेतील सलग तिसऱ्या सामन्यातील सलग तिसरा पराभव होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघाच्या खराब कामगिरीमुळे निराशा ( Rohit Sharma disappointed with team performance ) व्यक्त केली आहे.
रोहित शर्मा म्हणाला, संघाने नीट फलंदाजी आणि गोलंदाजी केली नाही, त्यामुळे आम्ही हा तिसरा सामनाही गमावला. पॅट कमिन्स अशी खेळी करेल, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. त्यामुळे या विजयाचे श्रेय आम्ही त्याला देतो. जसजसा खेळ पुढे सरकत गेला, तसतशी खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होत गेली. मात्र, अखेरच्या पाच षटकांत ७६ धावा केल्याबद्दल मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने संघाच्या फलंदाजांचे कौतुक केले. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक ( Suryakumar Yadav's half century ) आणि तिलक वर्माच्या नाबाद 38 आणि कायरॉन पोलार्डच्या पाच चेंडूत केलेल्या 22 धावांच्या जोरावर संघाला 150 धावांचा टप्पा पार करता आला.
शर्मा पुढे म्हणाले, एकूणच ही खेळपट्टी चांगली होती. आमची फलंदाजी चांगली झाली नाही, पण शेवटच्या 4-5 षटकांत खेळाडूंनी ज्या प्रकारे धावा केल्या, ते कौतुकास्पद आहे. पण त्यांनी सुरुवातीला आक्रमकता दाखवली असती, तर आम्ही सामना जिंकू शकलो असतो. कर्णधाराने असेही सांगितले की, “आम्ही ठरल्याप्रमाणे गोलंदाजी केली नाही. कमिन्सच्या शानदार फलंदाजीमुळे ( Cummins' superb batting ) सामना 16 व्या षटकात संपला."