महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 4, 2022, 5:00 PM IST

ETV Bharat / sports

Rohit Sharma Negative : रोहित शर्माची कोरोना टेस्ट निगेटिव्ह; टी-20 मालिकेला असणार उपलब्ध

कर्णधार रोहित शर्माची कोरोना टेस्ट निगेटीव्ह ( Rohit Sharma corona test negative ) आली आहे. त्यामुळे तो पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय संघाशी जोडला जाईल. या अगोदर तो पॉझिटिव्ह आल्याने त्याला कसोटीतून वगळण्यात आले होते.

Rohit Sharma
Rohit Sharma

लंडन: भारतीय कर्णधार रोहित शर्मा कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली ( Captain Rohit Sharma corona test negative ) आहे. आता तो इंग्लंडविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी उपलब्ध असेल, 7 जुलैपूर्वी साउथॅम्प्टनमध्ये टी-20 पासून सुरू होईल. लेस्टरशायर विरुद्धच्या चार दिवसांच्या सराव सामन्यात कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने रोहित शर्मा एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याला मुकवला. बीसीसीआयच्या एका सूत्राने रविवारी सांगितले की, होय, रोहित शर्मा निगेटिव्ह आला आहे आणि आता तो क्वारंटाईनच्या बाहेर आहे.

उल्लेखनीय म्हणजे, रोहित शर्माची तीनदा टेस्ट पॉझिटिव्ह आली ( Rohit Sharma three times tested positive ) होती, ज्यामुळे त्यांना 1 जुलैपासून सुरू झालेल्या कसोटीतून बाहेर ठेवण्यात आले होते. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत आहे. वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार, क्वारंटाईनमधून बाहेर पडणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या फुफ्फुसाची क्षमता तपासण्यासाठी हृदयाची अनिवार्य चाचणी करावी लागते. कोविड-19 झाल्यानंतर हे आवश्यक आहे. कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी रोहित तिसऱ्यांदा कोविड-19 पॉझिटिव्ह आढळला होता. रोहित आता पहिल्या टी-20 सामन्याधी संघाशी ( Rohit Sharma available for T20 series ) जोडला जाईल.

एकदिवसीय आणि T20 वेळापत्रक -

  • 7 जुलै, पहिली टी-20- साउथॅम्प्टन
  • 9 जुलै, दुसरी टी-20- एजबॅस्टन
  • 10 जुलै, तिसरा टी-20- नॉटिंगहॅम
  • 12 जुलै, पहिला वनडे - ओव्हल
  • 14 जुलै, दुसरी वनडे - लॉर्ड्स
  • 17 जुलै, तिसरी वनडे - मँचेस्टर

हेही वाचा -Indian Hockey Coach Statement : इंग्लंडविरुद्धच्या दोन ग्रीन कार्डने आमची गती खंडित केली - जेनेक शॉपमन

ABOUT THE AUTHOR

...view details