महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Rohit Sharma Captaincy : रोहित शर्माला जबरदस्तीनं कर्णधार बनवलं? 'या' माजी खेळाडूनं केला मोठा खुलासा

Rohit Sharma Captaincy : या विश्वचषकात रोहित शर्मानं आपल्या नेतृत्व कौशल्यानं सर्वांचीच मनं जिंकली आहेत. मात्र एक काळ असा होता जेव्हा रोहितला टीम इंडियाचा कर्णधार बनायचं नव्हतं. भारताच्या एका माजी कर्णधारानं याबाबत खुलासा केला आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 4:51 PM IST

नवी दिल्ली Rohit Sharma Captaincy : चालू आयसीसी विश्वचषकात टीम इंडिया दमदार कामगिरी करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं संपूर्ण विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. रोहितच्या संघाचे ८ सामन्यात ८ विजयांसह १६ गुण असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. आता भारतीय संघ १२ नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये नेदरलँड विरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळेल.

रोहितला कर्णधार बनायचं नव्हतं : या विश्वचषकात रोहित शर्मानं कर्णधार म्हणून आपली चांगली छाप सोडली. यापूर्वी त्यानं टी २० आणि कसोटी फॉरमॅटमध्येही संघाला अव्वल स्थानावर नेलंय. मात्र तुम्हाला माहीत आहे का की, रोहितला एकेकाळी टीम इंडियाचा कर्णधार बनायचा नव्हतं! एक वेळ अशी आली जेव्हा त्याच्याकडे कर्णधार बनण्याशिवाय पर्याय नव्हता. जर त्यानं कर्णधारपदासाठी हो म्हटलं नसतं तर त्याला बळजबरीनं कॅप्टन बनवलं गेलं असतं. होय, हे अगदी खरं आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीनं स्वतः याबाबत सांगितलं.

रोहित नेतृत्व करण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती : मीडियाशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, 'रोहित शर्माला कर्णधारपद नको होतं. एक वेळ अशी आली होती की मी त्याला म्हणालो, तुला कर्णधारपदासाठी हो म्हणावं लागेल. नाहीतर मी सरळ तुझं नाव जाहीर करेल. त्यानंतर त्यानं कर्णधारपद स्वीकारलं याचा मला आनंद आहे. तो नेतृत्व करण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती आहे. तो स्वत: पुढाकार घेऊन टीम इंडियाचं नेतृत्व करतो, जी खूप चांगली गोष्ट आहे, असं गांगुलीनं सांगितलं.

१०२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केलं : रोहित शर्मानं आतापर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये मिळून एकूण १०२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलंय. यापैकी त्यानं ७६ सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रनं जिंकला ऑक्टोबर 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार
  2. Cricket World Cup 2023 : भारत-पाकिस्तान उपांत्य सामना अद्यापही शक्य, कसा ते जाणून घ्या
  3. Cricket World Cup 2023 : इंग्लंडचा नेदरलॅंडवर मोठा विजय, बेन स्टोक्सचं शानदार शतक

ABOUT THE AUTHOR

...view details