हैदराबाद - दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत ( South Africa test series )पराभवानंतर विराट कोहलीने आपल्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कसोटी संघाचा कर्णधार कोण होणार, याबाबत क्रिकेट वर्तूळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु होती. अखेर त्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. रोहित शर्माची कसोटी कर्णधारपदी निवड करण्यात आली ( Rohit Sharma Test Team Captain ) आहे.
रोहित शर्मा, केएल राहूल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या चार जणांच्या नावावर चर्चा सुरु होती. मात्र, श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापुर्वी रोहित शर्माला असलेला अनुभवच्या आधारे बीसीसीआयने रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे आता यापुढे रोहित शर्मा कसोटी, वनडे आणि टी20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
दरम्यान, बीसीसीआयने भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी आणि टी20 दौऱ्याची घोषणा केली ( BCCI Announce Team IND VS SRi ) आहे. त्यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी वगळले आहे. तर रविंद्र जाडेजाचे संघात पुनरागमन झाले आहे.
भारतीय कसोटी संघ