मुंबई Rohit and Virat Crying:2023 च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघानं विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी सलग 10 सामने जिंकले होते. मात्र, त्यांना अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसंच विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये रडत होते, असं अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विननं सांगितलं.
विश्वचषकात भारतीय संघाचा पराभाव : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाच्या शानदार मोहिमेचा निराशाजनक शेवट झाला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाकडून 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला होता.
विराट कोहली, रोहित शर्माला रडताना पाहून मला वेदना झाल्या. या विश्वचषकाचा विजय आमच्या नशिबात नव्हता. भारतीय संघ अनुभवी होता. प्रत्येक खेळाडूला काय करायचं माहित होतं - रविचंद्रन अश्विन, ऑफस्पिनर
भारतीय संघाची इच्छा अपूर्ण :भारतीय संघानं विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी सलग 10 सामने जिंकले होते, परंतु त्यांना विजय मिळवता आला नव्हता. भारतीय संघानं 2013 पासून आयसीसी विश्वकप जिंकता आलेला नाही. विश्वचषक 2023 च्या विश्वचषकात देखील भारतीय संघाची इच्छा अपूर्ण राहिली. भारतीय संघाच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज रडतानाचे व्हिडिओ सर्वांनी पाहिले होते.
रविचंद्रन अश्विनचा खुलासा :भारतीय संघाच्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममधील वातावरण कसं होतं? यावर अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं खुलासा केला आहे. अश्विननं त्याच्या यूट्यूब चॅनलवर एस. बद्रीनाथ यांच्याशी झालेल्या संभाषणात म्हटलंय की, पराभवानंतर विराट कोहली तसंच भारतीस संघाचा कर्णधार रोहित शर्माला रडताना पाहून वेदना झाल्या.
रोहित शर्मा कौतुकास पात्र :रविचंद्रन अश्विन म्हणाला की, कर्णधार रोहित शर्मा एक अद्भुत व्यक्ती आहे. रोहित शर्मा संघातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं ओळखतो. प्रत्येकाला काय आवडते, काय आवडत नाही या बाबत रोहित शर्माला सर्व माहित असल्याचं अश्विन म्हणाला.
हेही वाचा -
- टी 20 विश्वचषकांनतर भारतीय क्रिकेट संघ करणार श्रीलंकेचा दौरा; पाहा मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
- वर्ल्डकप फायनलमधील पराभवानंतर विराट कोहलीचा मोठा निर्णय, फॅन्सची धाकधूक वाढली
- राहुल द्रविडच राहणार टीम इंडियाचा हेड कोच, व्हीव्हीएस लक्ष्मणकडे 'ही' जबाबदारी