नवी दिल्ली : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत गेल्या वर्षी गंभीर जखमी झाल्यानंतर आता तंदुरुस्त होत आहे. पंत नुकताच बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) गेला होता. तेथे त्याने रिहाब प्रोग्राम सुरू केला आहे. पंत पुन्हा टीम इंडियाची जर्सी परिधान करून मैदानात उतरण्यास उत्सुक आहे आणि त्यासाठी तो जोमाने मेहनत घेत आहे. पंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याच्या चाहत्यांसाठी त्याच्या रिहाब प्रोग्रामचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतो. नुकताच ऋषभ पंतने त्याचा असा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावर राहणार नाही.
पंत पहिल्यांदाच कोणत्याही आधाराशिवाय चालला : ऋषभ पंतने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने 'नो मोर बैसाखी' असे लिहिले आहे. व्हिडिओमध्ये ऋषभ पंत प्रथम कुबड्या घेऊन चालण्यास सुरुवात करतो. मग तो मध्येच थांबतो आणि त्याच्या हातातली काठी काढून त्याच्या प्रशिक्षकाकडे फेकतो. त्यानंतर पंत कोणत्याही आधाराशिवाय छोटे पावले टाकतो. या व्हिडिओमध्ये पंत खूप आनंदी दिसत आहे. पंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुखापतीनंतर पहिल्यांदाच या डॅशिंग खेळाडूला स्वत:च्या पायावर चालताना पाहून त्याचे चाहतेही खूप खूश आहेत.