बर्मिंगहॅम:इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. पहिल्या डावात धडाकेबाज शतक झळकावल्यानंतर ऋषभने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावून भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले. भारतीय संघाचा दुसरा डाव 81.5 षटकांत 245 धावांवर आटोपला. तसेच इंग्लंडला 378 धावांचे लक्ष्य दिली आहे. या सामन्यात ऋषभ पंतच्या नावावर दोन्ही डावात दणदणीत कामगिरीसह अनेक विक्रमही ( Wicketkeeper-batsman Rishabh Pant record ) झाले आहेत.
एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने इंग्लंडवर पलटवार करत 146 धावा केल्या. ऋषभ पंतने या खेळीत 19 चौकार, 4 षटकार मारले. ऋषभ पंतने दुसऱ्या डावात 8 चौकारांसह 57 धावा केल्या. ऋषभ पंत कसोटीत शतक आणि अर्धशतक दोन्ही झळकावणारा दुसरा यष्टीरक्षक ठरला आहे.
एकाच कसोटीत शतक आणि अर्धशतक ठोकणारे भारतीय यष्टीरक्षक:
• फारुख इंजिनियर विरुद्ध इंग्लंड, ब्रेबॉर्न 1973 (121 + 66)
• ऋषभ पंत विरुद्ध इंग्लंड, एजबॅस्टन 2022 (146+57)
याशिवाय ऋषभ पंतने आणखी एक विक्रम केला, तो इंग्लंडमधील कसोटी सामन्यात परदेशी यष्टीरक्षकाकडून सर्वाधिक धावा करण्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे. ऋषभ पंतने येथे 72 वर्षे जुना विक्रम मोडला आहे.
इंग्लंडमध्ये परदेशी यष्टीरक्षकाने सर्वाधिक धावा (कसोटीमध्ये)
203, ऋषभ पंत (एजबॅस्टन, 2022) 146 + 57