नवी दिल्ली- स्टार इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला गुरुवारी कोव्हीड -१९ प्रतिबंधक लसचा पहिला डोस मिळाला.
न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये होणाऱया मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या ऋषभने फोटो पोस्ट करुन लस घेतल्याचे कळवले आहे.
''मी लसीचा पहिला डोस घेतला. तुम्ही जर पात्र असाल तर कृपया लस घ्या. जितक्या लवकर आपण घेऊ तितक्या लवकर कोरोना व्हायरसचा पराभव करता येईल.,'' असे पंतने आपल्या ट्विटरवर लिहिले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या कसोटी मालिकेतील विजयात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यामुळे पंत यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अलिकडेच पुढे ढकलण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते.
कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह पंतच्या अनेक साथीदारांनी देशातील वेगवेगळ्या केंद्रांवर कोविड प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतला आहे.
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे लस घेणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील पहिले व्यक्ती होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण खुले केले गेले तेव्हा शास्त्री यांनी लस घेतली होती.
हेही वाचा - Happy International Nurses Day: सचिनने नर्सेसच्या सन्मानार्थ बदलला डीपी, लिहला 'हा' खास संदेश