मॅंचेस्टर -इंग्लंड विरुद्ध भारत ( IND VS ENG 3rd ODI ) यांच्यात वनडे मालिकेतील अखेरचा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवर येथे खेळण्यात आला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २६० धावांचे आव्हान ठेवले आहे. हे आव्हान भारताने 261 धावा करत 5 विकेट राखून पार केले आहे. मात्र, भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंतने संघ अडचणीत असताना चौथ्या क्रमाकांवर फलंदाजीला येत शानदार शतक झळकवले आहे.
इंग्लंड संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या सलामी जोडीने पहिल्या गड्यासाठी 12 धावा केल्या. या धावसंख्यावर सलग दोन विकेट्स पडल्याने इंग्लंडला मोठा धक्का बसला. त्यामुळे इंग्लंड संघाने शतक पूर्ण करण्या अगोदर म्हणजे 74 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर कर्णधार जोस बटलर आणि मोईन अलीने पाचव्या विकेट्साठी 75 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर मोईन अलीने 34 (44) धावांवर बाद झाला. त्यानंतर इग्लंडच्या संघाकडूमन छोट्या भागीदारी झाल्या. परंतु त्याचा डाव 45.5 षटकांत 259 धावांवर आटोपला.