बंगळुरु :भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघात कसोटी मालिकेतील दुसरा म्हणजेच पिंक बॉल कसोटी ( Pink Ball Test ) खेळला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. तसेच या सामन्यातील दोन्ही संघाचे पहिले डाव खेळले गेले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये खेळताना भारतीय यष्टीरक्षक आणि फलंदाज रिषभ पंतने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
दुसऱ्या डावात फलंदाजी करायला आलेलल्या रिषभ पंतने ( Batsman Rishabh Pant ) भारतीय संघाचा पडझड थांबवताना एका अनोख्या विक्रमला गवसणी घातली आहे. रिषभने फक्त 28 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने भारताचे महान खेळाडू कपिल देव यांचा कसोटीतील वेगवान अर्धशतकाचा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच तो भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक लगावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. या अगोदर हा विक्रम कपिल देव ( Great all-rounder Kapil Dev ) यांच्या नावावर होता. त्यांनी 1982 साली पाकिस्तान विरुद्ध फक्त 30 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
कसोटीत क्रिकेटमध्ये कमी चेंडूत अर्धशतक ठोकणारे भारतीय फलंदाज -
28 चेंडू रिषभ पंत विरुद्ध श्रीलंका - बंगळुरु - 2022
30 चेंडू कपिल देव विरुद्ध पाकिस्तान - कराची - 1982
31 चेंडू शार्दुल ठाकूर विरुद्ध इंग्लंड - ओव्हल - 2021
32 चेंडू विरेंद्र सेहवाग विरुद्ध इंग्लंड - चेन्नई - 2008