मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore ) संघाची कामगिरी शानदार राहिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सध्या गुणतालिकेत दहा गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तरी देखील आता आरसीबीचा संघ एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. कारण आरसीबीचा संघ मैदानावर मोठ्या प्रमाणात जीव तोडून खेलताना दिसतोय. कारण मागील सामन्यात या संघाने उत्तम क्षेत्ररक्षण केले आहे.
आरसीबीच्या खेळाडूंनी खेळपट्टीवर काही चमकदार क्षेत्ररक्षण करताना 16 एप्रिल रोजी दिल्लीचा 16 धावांनी पराभव केला. दिनेश कार्तिकने सामन्यात नाबाद 66 धावांची खेळी केली, माजी कर्णधार विराट कोहली ( Former captain Virat Kohli ) मैदानावर फार काही दाखवू शकला नाही, तर रावत, प्रभुदेसाई आणि डु प्लेसिस मैदानावर डीसीचे अनेक चौकार वाचवण्यात यशस्वी ठरले.
19 एप्रिल रोजी, लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात, आरसीबीने 18 धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत क्रमांक 2 वर पोहोचले. या सामन्यात प्रभुदेसाई यांनी चांगला झेल घेतला, तर कोहली, डु प्लेसिस आणि रावत यांनी मैदानावर अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. आपल्या संघाला मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करताना पाहून फाफ डू प्लेसिसला ( Faf du Plessis ) देखील खूप आनंद झाला आहे. तो म्हणाला, आमच्या संघात चांगले खेळाडू आहेत. आम्ही प्रत्येक वेळी मैदानावर आमचे 100 टक्के देतो याची आम्हाला खात्री आहे.