नवी दिल्ली : स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि अॅलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील यूपी वॉरियर्स यांच्यात आज एक रोमांचक सामना पाहायला मिळेल. यूपी वॉरियर्सचा हा हंगामातील तिसरा सामना आहे. त्याचवेळी आरसीबी आपला चौथा सामना खेळणार आहे. यूपी वॉरियर्सने त्यांचा पहिला सामना 5 मार्च रोजी गुजरात जायंट्स विरुद्ध खेळला होता, ज्यामध्ये अॅलिसा हिलीच्या संघाने 3 विकेट्सने विजय मिळवला होता. 7 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात यूपी वॉरियर्स (UPW) ला पराभवाचा सामना करावा लागला होता. वॉरियर्सला 42 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्याच वेळी, आरसीबीला 5 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सकडून 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरा सामना 6 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मुंबई इंडियन्सकडून नऊ विकेटने हरला होता.
आरसीबी पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची पराभवाची हॅट्ट्रिक 8 मार्च रोजी झाली, जेव्हा त्यांना गुजरात जायंट्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. तीनही सामने गमावून आरसीबी पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. आरसीबीच्या गोलंदाजांनी आतापर्यंत विशेष कामगिरी केलेली नाही. संघाच्या तीन प्रमुख गोलंदाज रेणुका सिंग, प्रीती बोस आणि मेगन शुट यांना आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये केवळ तीन विकेट घेता आल्या आहेत.