महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND v SL : भारताचा ८ बाद ५७४ वर डाव घोषित, श्रीलंका ४ बाद १०८ - India's run hill

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने धावांचा डोंगर रचला आहे. रविंद्र जडेजाच्या झुंझार शतकी खेळीने श्रीलंकन गोलंदाजांचे अक्षरशः दमछाक उडाली.

श्रीलंका ४ बाद १०८
श्रीलंका ४ बाद १०८

By

Published : Mar 5, 2022, 1:58 PM IST

Updated : Mar 5, 2022, 5:32 PM IST

मोहाली- आयएस बिंद्रा पीसीए स्टेडियमवर शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने धावांचा डोंगर रचला आहे. रविंद्र जडेजाच्या झुंझार शतकी खेळीने श्रीलंकन गोलंदाजांचे अक्षरशः दमछाक उडाली.

भारताच्या वतीने खेळताना मयंक अग्रवाल ३३ व रोहित शर्माने २९ धावा करीत पहिल्या दिवसाची सुरूवात केली होती. त्यानंतर हनुमा विहारीने अर्धशतक ठोकून सर्वांची वाहवा मिळवली. त्याने ५८ धावा काढल्या. आपला शंभरावा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीने दमदार सुरूवात केली , परंतु अर्ध शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो ४५ धावावर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतने तडाखेबंद फलंदाजी केली. परंतु अखेरच्या क्षणी त्याला शतकाने हुलकावणी दिली. ऋषभ ९६ धावावर बाद झाला. श्रेयस अय्यरने २७ धावा केल्या.

शतक झळकवल्यानंतर रविंद्र जडेजा

सामन्याचा दुसरा दिवस संस्मरणीय बनवला तो रविंद्र जडेजाने. जडेजा नाबाद १७५ धावा काढून भारताचा डावाला मजबूत बनवले आहे. अखेरच्या क्षणी त्याला मोहम्मद शामीने नाबाद २० धावा काडून चांगली साथ दिली.

भारताने ८ बाद ५७४ वर आपला पहिला डाव घोषित केला आहे.

श्रीलंकेचे डळमळीत सुरूवात

भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ वर घोषित केल्यानंतर श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. सलामीला आलेल्या दिमुथ करुणरत्ने आणि लाहिरु थिरीमने यांनी सुरूवात चांगली केली असताना ४८ धावावर पहिला गडी बाद झाला. लाहिरु थिरीमने याने १७ धावा केल्या तर दिमुथ करुणरत्ने २८ धावावर तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या अँजेलो मॅथ्यू २२ धावावर बाद झाला. धनंजय डिसिल्वाही केवळ १ धावावर परतला. अशा प्रकारे श्रीलंकेचा पहिला डाव डळमळला असून ४ बाद १०८ धावा संघाने केल्या आहेत.

हेही वाचा -Ind Vs Sl 1st Test : रिषभ पंतची जोरदार फटकेबाजी ; पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारत 6 बाद 357

Last Updated : Mar 5, 2022, 5:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details