मुंबई:मंगळवारी (12 एप्रिल) आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 22 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( CSK vs RCB ) संघात खेळला गेला. डीवाय पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात, सीएसकेने आरसीबीवर 23 धावांनी मात करत आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. आपल्या या पहिल्या विजयानंतर कर्णधार रवींद्र जडेजाने महत्वाची प्रतिक्रिया ( Ravindra Jadeja Statement ) दिली आहे.
सीएसकेने मंगळवारी रॉबिन उथप्पा ( Robin Uthappa ) (88) आणि शिवम दुबे ( Shivam Dubey ) यांनी नाबाद (95) धावांच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore ) ला 23 धावांनी पराभूत करून पाच सामन्यांमध्ये पहिला विजय नोंदवला. त्यानंतर कर्णधारपद स्वीकारल्यापासून टीकेचा धनी झालेला रवींद्र जडेजाने विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
पहिला विजय मी माझ्या पत्नीला समर्पित करू इच्छितो - रवींद्र जडेजा
सामन्यानंतर जडेजा ( Ravindra Jadeja Said on 1st win ) म्हणाला, कर्णधार म्हणून मी अजूनही वरिष्ठ खेळाडूंकडून धडे घेत आहे. मी नेहमी धोनीभाईंसोबत कर्णधारपदावर ( Ravindra Jadeja captaincy ) चर्चा करतो. मी अजूनही शिकत आहे आणि प्रत्येक गेममध्ये चांगले करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जडेजाने आरसीबीविरुद्ध चार षटकांत 39 धावा देत तीन बळी घेतले. तो पुढे म्हणाला, आम्हाला अनुभव आहे आणि खेळातून अनुभव येतो, आम्ही लवकर घाबरत नाही. आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळायचे आहे.
तो म्हणाला, हा विजय मी माझ्या पत्नीला समर्पित करू इच्छितो. कारण पहिला विजय नेहमीच खास असतो. एक फलंदाज म्हणून, रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी चमकदार फलंदाजी करताना सर्वजण चांगले खेळले. त्याचबरोबर गोलंदाजांनीही चेंडूने हातभार लावला.