मुंबई: भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ( Indian off spinner Ravichandran Ashwin ) शनिवारी 36 वर्षांचा ( Ravichandran Ashwin 36th birthday ) झाला. त्याचे अभिनंदन करताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) स्टार ऑफस्पिनरच्या कामगिरीला उजाळा दिला. तसेच त्याच्या भविष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या विश्वचषकासाठी अश्विनचा भारतीय टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासोबत संघात अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल हे आणखी दोन फिरकी गोलंदाज आहेत.
अश्विनसाठी आपल्या संदेशात ( BCCI message for Ashwin ), बीसीसीआयने लिहिले की, 255 आंतरराष्ट्रीय सामने, 659 आंतरराष्ट्रीय विकेट आणि 3799 आंतरराष्ट्रीय धावा, कसोटीत टीम इंडियासाठी दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज, 2011 आयसीसी विश्वचषक आणि 2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता अश्विनला त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.