मुंबई:देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज मुंबई आणि उत्तर प्रदेश ( Mumbai vs Uttar Pradesh ) संघात उपांत्य फेरीच्या सामना पार पडला. या सामन्यात शेवटच्या दिवशी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर रणजी करंडक अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याची औपचारिकता पूर्ण केली. जस्ट क्रिकेट अकादमीच्या मैदानावर 41 वेळच्या चॅम्पियन संघाने या सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून वर्चस्व गाजवत उत्तर प्रदेशला एकही संधी दिली नाही. सामना अनिर्णित राहिला. तसेच मुंबईचा संघ विक्रमी 47व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत ( Mumbai reached final for 47th time ) पोहोचला आहे. 22 जून रोजी होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत मुंबईचा सामना मध्य प्रदेशशी होणार आहे. ज्यांनी पहिल्या उपांत्य फेरीत बंगालचा 174 धावांनी पराभव केला.
मुंबईचा संघ विक्रमी 47व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत -
मुंबईने 46 वेळा रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असून 41 वेळा विजेतेपद पटकावले आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात सर्व गड्यांच्या मोबदल्यात 393 धावा केल्या. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशचा संघ पहिल्या डावात 180 धावांवर गारद झाला. पहिल्या डावाच्या जोरावर मुंबईने 213 धावांची आघाडी घेतली. यशस्वी आणि अरमानच्या शतकांमुळे मुंबईने दुसऱ्या डावात 4 बाद 533 धावांवर आपला डाव घोषित केला. मात्र, उत्तर प्रदेशचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला नाही आणि सामना अनिर्णित राहिल्यानंतरही पहिल्या डावात अधिक धावा केल्याने मुंबईला विजयी घोषित करण्यात आले.