हैदराबाद:कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर बुधवारी आयपीएल 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात बंगळुरू संघाने लखनौविरुद्ध 14 धावांनी विजय मिळवला. या विजयासह, त्यांनी क्वालिफायर 2 चे तिकीट निश्चित केले आहे. या सामन्याचा हिरो ठरलेल्या रजत पटीदारची ( Rajat Patidar ) आश्चर्याची गोष्ट म्हणजे यंदाच्या आयपीएलच्या मेगा लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. बदली खेळाडू म्हणून त्याला मोसमाच्या मध्यात बंगळुरू संघात स्थान देण्यात आले. आरसीबीचा क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान संघाशी होईल.
फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मेगा लिलावात रजत पाटीदार विकला गेला नाही. त्याच्या जुन्या फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने देखील त्याच्यावर बोली लावली नव्हती. ज्याने 20 लाखांच्या मूळ किमतीसह लिलावात भाग घेतला होता. मात्र, रजत पाटीदार स्वतःचे नशीब स्वतःच लिहिणार होता. कारण त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अर्थात आरसीबीने जवळपास अर्ध्या स्पर्धा संपवल्यानंतर मध्यभागी बदली म्हणून संघासोबत जोडले होते.
आरसीबीने त्यावेळी विचारही केला नसेल की तो असा सामना संघाला जिंकून देईल, ज्याची कोणालाच अपेक्षा नसेल. आयपीएल 2022 च्या एलिमिनेटर सामन्यापूर्वी, त्याला या हंगामात फक्त काही सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये तो थोडा यशस्वी झाला. पण त्याने लखनौ सुपर जायंट्स म्हणजेच एलएसजी विरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळून सिद्ध केले की, आरसीबीने त्याला खरेदी न करून चूक केली होती.
लवनीथ सिसोदियाच्या जागी रजतला आरसीबीमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्याने एलिमिनेटर सामन्यात 54 चेंडूत 12 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 112 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइकरेट 207 पेक्षा जास्त होता. या खेळीच्या जोरावर आरसीबीने विजय मिळवला आणि रजत पाटीदारला सामनावीराचा किताब मिळाला. इंदूरच्या या 28 वर्षीय खेळाडूने अशा पद्धतीने स्वतःचे नशीब स्वतःच लिहिले आहे.
कोहलीने रजत पाटीदारच्या कामगिरीचे केले कौतुक -
आयपीएल 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सवर 14 धावांनी विजय मिळवल्याने, स्टायलिश फलंदाज विराट कोहलीने रजत पटीदारच्या कामगिरीचे कौतुक केले. पटीदारने बुधवारी ईडन गार्डन्सवर 54 चेंडूत नाबाद 112 धावा करून बंगळुरूच्या विजयाचा पाया रचला. आता शुक्रवारी अहमदाबादमध्ये आरसीबीचा राजस्थान रॉयल्ससोबत क्वालिफायर 2 मध्ये सामना होणार आहे.
यावर पटीदार म्हणाला, हा खूप दबावाचा सामना होता, पण मला विश्वास होता की, मी भागीदारी केली तर मी संघाला चांगल्या स्थितीत आणू शकेन. मी सुरुवातीला काही डॉट बॉल्स खेळले याने काही फरक पडला नाही. कारण मला विश्वास होता की जर मी जास्त वेळ विकेटवर राहिलो तर मी ते कव्हर करू शकेन. पटीदारने बंगळुरूसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली, कोहलीसोबत 66 धावांची सलामी दिली, ज्याने 25 धावा केल्या आणि त्यानंतर यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकसह 92 धावांची धडाकेबाज भागीदारी केली, जो 23 चेंडूत 37 धावांवर नाबाद राहिला.
लखनौ 208 धावांचा पाठलाग करण्याच्या जवळ आले होते, परंतु 19व्या षटकात केएल राहुलला वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने बाद केले. तेव्हा सामना पूर्णपणे बंगळुरूच्या बाजूने झुकला. विराट कोहली म्हणाला, “शेवटी काही तणावाचे क्षण आले. साहजिकच हा मोठा सामना होता पण मला वाटते की आमच्या गोलंदाजांनी सामना चांगलाच राखला. वानिंदू हसरंगा, हेजलवूड, हर्षल, सिराज आणि शाहबाज यांनी शानदार गोलंदाजी केली. बंगळुरू आता शुक्रवारी क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानशी सामना करण्यासाठी अहमदाबादला प्रयाण करेल, जिथे या सामन्यातील विजेत्याचा सामना रविवारी त्याच ठिकाणी गुजरात टायटन्सशी होईल.
कोहली म्हणाला, आम्ही एक पाऊल पुढे गेल्याने आम्हाला खरोखर आनंद झाला. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आमच्याकडे एक दिवस आहे आणि त्यानंतर आम्ही क्वालिफायर 2 खेळू. अहमदाबादला पोहोचण्यासाठी आणि पुन्हा मैदानावर येण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. या स्पर्धेत आम्हाला आणखी पुढे जायचे आहे. आशा आहे की आणखी दोन चांगले सामने जातील आणि त्यानंतर लीग जिंकल्यावर आम्ही सर्व आनंद साजरा करू शकू.
हेही वाचा -KL Rahul Statement : आम्ही चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण... - केएल राहुल