मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2022 ) पंधराव्या हंगामात आयपीएलच्या पहिला विजेता संघ राजस्थान रॉयल्स संघाची ( Rajasthan Royals Team ) कामगिरी शानदार राहिली आहे. या संघाने आतापर्यंत अकरा सामन्यात सात विजय नोंदवत 14 गुणांनी गुणतालिकेत तिसरे स्थान काबीज केले आहे. शनिवारी पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानला शिमरॉन हेटमायरने दमदार विजय मिळवून दिला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सकडून एक मोठी बातमी समोर आली आहे.
राजस्थान रॉयल्स संघाचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायर ( Star batsman Shimron Hetmyer ) बायो-बबल सोडून गयानाला परतला आहे. याबाबत अधिकृत माहिती राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीने दिली आहे. फ्रेंचायझीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. तथापि, हेटमायरने तात्पुरते बायो बबल सोडले आहे आणि लवकरच तो राजस्थानमध्ये परत येईल. फ्रँचायझीने एक निवेदन जारी केले की हेटमायर प्रथमच वडील झाला ( Shimron Hetmyer first time father ) आणि म्हणूनच तो बायो बबल सोडून गयानाला गेला. हेटमायरचा प्री-डिपार्चर व्हिडिओ फ्रँचायझीने ट्विटरवर पोस्ट केला आहे आणि त्यात तो खूप आनंदी दिसत आहे.