महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : राजस्थान रॉयल्स संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी स्टीफन जोन्सची नियुक्ती - आयपीएल 2022 लेटेस्ट अपडेट्स

इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पहिल्या हंगामाचे चॅम्पियन राजस्थान रॉयल्सने स्टीफन जोन्सची वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

Stephen Jones
Stephen Jones

By

Published : Mar 4, 2022, 5:03 PM IST

जयपुर :आयपीएल 2022 च्या स्पर्धेचे बिगुल वाजले आहे. या स्पर्धेला 26 मार्च पासून सुरुवात होणार आहे. यंदा आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 10 संघाचा समावेश आहे. सर्व 10 संघांनी आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी कंबर कसली आहे. तसेच या हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाने गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा स्टीफन जोन्सची (Bowling Coach Stephen Jones ) नियुक्ती केली आहे.

48 वर्षीय जोन्स हा वेल्सचा माजी वेगवान गोलंदाज आहे जो कौंटी क्रिकेटमध्ये केंट, सॉमरसेट, नॉर्थम्प्टनशायर आणि दुबिरशायरकडून खेळला होता. त्याने 148 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 387 बळी घेतले आहेत. त्याने या अगोदर 2019 साली वेगवान गोलंदाजीचा कोच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

राजस्थान रॉयल्स संघाच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक ( Rajasthan Royals fast bowling coach ) पदी निवड झाल्यानंतर स्टीफन जोन्सने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, राजस्थान रॉयल्समध्ये परत आल्याने मी आनंदी आहे. मला या संघासोबत पुन्हा काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी संघ व्यवस्थापनाचा आभारी आहे. आमच्या संघातील प्रतिभावान गोलंदाजांसह मी वर्षभर काम करण्यास उत्सुक आहे.

जोन्स नवीन भूमिकेचा एक भाग म्हणून, वर्षभर संघाचा भाग असलेल्या सर्व गोलंदाजांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान करेल. नागपूर येथील रॉयल्सच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये 7 ते 10 मार्च दरम्यान होणाऱ्या प्री-सीझन शिबिरात तो संघासोबत काम करेल. राजस्थान रॉयल्सने सांगितले ( Rajasthan Royals told ) की, स्टीफन गेल्या अनेक वर्षांपासून फ्रँचायझीशीच्या जवळ आहे. त्यामुळे तो संघाला पूर्णपणे समजून घेतो आणि त्याच्यासोबत एक अतिशय सक्षम प्रशिक्षक शैली आणतो. ज्याचे खेळाडू आणि व्यवस्थापन या दोघांनीही यापूर्वी कौतुक केले आहे.

राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक संगकारा म्हणाला ( Rajasthan Royals cricket director Sangakkara said ), "फ्रँचायझीमधील त्याच्या नवीन भूमिकेत त्याचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. ज्यामध्ये तो आमच्या गोलंदाजांसोबत काम करेल. तसेच त्यांना वर्षभर पाठिंबा देईल आणि आम्हाला विश्वास आहे की, त्याचे कौशल्य आम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकते."

ABOUT THE AUTHOR

...view details