महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

GT vs CSK : चेन्नईच्या खेळाडूंनी पावसात घेतला ढोकळा व फाफडा जिलेबीचा आस्वाद!, नेहरानेही लुटला आनंद - गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज

आयपीएल 2023 आजपासून सुरू होत आहे. मात्र सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. गुजरातमधील अनेक शहरांमध्ये गुरुवारी पाऊस झाला. अहमदाबादमध्येही हलका पाऊस पडला. यादरम्यान खेळाडूंनी गुजराती पक्वानांचा आस्वाद घेतला.

GT vs CSK
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज

By

Published : Mar 31, 2023, 9:10 AM IST

नवी दिल्ली : अहमदाबादमधील ढगाळ हवामानामुळे इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या सलामी सामन्यात अडथळा येऊ शकतो. गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना होणार आहे. गुरुवारी अहमदाबादमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे दोन्ही संघांना सराव थांबवावा लागला होता.

चेन्नईच्या खेळाडूंनी खाल्ले गुजराती पक्वान : पावसामुळे सराव थांबवावा लागला असताना, गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा पावसाचा आनंद लुटताना दिसले. तर टायटन्सचा केन विल्यमसन पाऊस पडताच मैदानाबाहेर पळताना दिसला. तर दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी डगआऊटमध्ये बसून पावसाचा आनंद लुटला. तसेच चेन्नईच्या खेळाडूंनी पावसात जिलेबी, ढोकळा आणि फाफडा देखील खाल्ला.

गुजरात टायटन्सचा 24 सदस्यीय संघ :आयपीएल 2023 साठी गुजरात टायटन्सचा 24 सदस्यीय संघ पुढीलप्रमाणे - हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, कोना भरत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विल्यमसन, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, प्रदीप संगवान, मोहम्मद शमी, विजय शंकर, साई सुदर्शन, आर साई किशोर, शिवम मावी, मॅथ्यू वेड, ओडियन स्मिथ, राशीद खान, उर्विल पटेल, डेव्हिड मिलर (पहिल्या 2 सामन्यासाठी अनुपलब्ध), जोश लिटल (पहिल्या सामन्यात अनुपलब्ध), दर्शन नळकांडे, यश दयाल, जयंत यादव, ओडियन स्मिथ, नूर अहमद, अल्झारी युसूफ.

चेन्नई सुपर किंग्जचा २४ सदस्यीय संघ : आयपीएल 2023 साठी चेन्नई सुपर किंग्जचा 24 सदस्यीय संघ पुढीलप्रमाणे - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, सिसांडा मगाला, शिवम दुबे, अहय मंडल, ड्वेन प्रिटोरियस, निशांत सिंधू, राजवर्धन हंगेर, राजकुमार हंसकर सेनापती, सिमरजित सिंग, मथिसा पाथीराना, मिचेल सँटनर, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, महेश थिकशन, तुषार देशपांडे.

हेही वाचा :X Factor For CSK in IPL 2023 : रवींद्र जडेजा आणि बेन स्टोक्स सीएसकेसाठी ठरणार एक्स फॅक्टर; हरभजन सिंग आणि मॅथ्यू हेडन यांचा विश्वास

ABOUT THE AUTHOR

...view details