नवी दिल्ली : Syed Haider Ali passes away: देशांतर्गत क्रिकेटपटू सय्यद हैदर अली यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. प्रयागराजमध्ये हैदर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात सय्यद शेर अली आणि रझा अली अशी दोन मुले आहेत.
Syed Haider Ali passes away: रेल्वे क्रिकेटचा बादशाह सैय्यद हैदर अली यांचं निधन..
Syed Haider Ali passes away: सय्यद हैदर अली यांचे प्रयागराज येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 25 वर्षे रेल्वेकडून खेळले आणि त्यांनी 113 सामन्यात 366 विकेट घेतल्या.
सर्वोत्तम डावखुरा फिरकीपटू असलेले हैदर अली भारताकडून कधीही खेळू शकले नाहीत. त्यांचा मुलगा रझा अली, माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू, म्हणाले, "त्यांना काही दिवसांपासून छातीत दुखत होते. डॉक्टरांची तपासणी करून आम्ही घरी परतत असताना अचानक ते कोसळले."
हैदर अलीने 1963-64 मध्ये रेल्वेसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले आणि जवळपास 25 वर्षे संघासाठी खेळले. त्यांनी 113 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 366 विकेट्स घेतल्या ज्यामध्ये त्याने तीन वेळा 10 विकेट्स आणि 25 वेळा पाच विकेट घेतल्या. त्यांनी 158 डावांमध्ये तीन शतके आणि 10 अर्धशतकांसह 3,125 धावा केल्या.