मुंबई - भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने आज कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. अजिंक्य सोशल मीडियावर फोटो ट्विट करत याची माहिती दिली.
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतानाचा फोटो अजिंक्यने ट्विट केला आहे. त्यासोबत त्याने म्हटलं आहे की, आज मी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. मी सर्वांना रजिस्ट्रेशन करण्याचे आणि डोस घेण्याचे आवाहन करतो.
दरम्यान, अजिंक्य भारतीय कसोटी संघाचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत ७३ कसोटी सामने खेळली आहे. यात त्याने ४१.२९ च्या सरासरीने ४ हजार ५८३ धावा केल्या आहेत. यात १२ शतकं आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे.