मोहाली : बीसीसीआयने बुधवारी खेळाडूंची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर ( BCCI announce central contract ) केली आहे. यामध्ये काही राष्ट्रीय खेळाडूंना फायदा, तर काही खेळाडूंना तोटा झालेला दिसत आहे. ज्यामध्ये अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना बीसीसीआयच्या ( Board of Control for Cricket in India) ताज्या केंद्रीय करार यादीत खालच्या श्रेणीत हलवण्यात आले आहे, ज्याला बोर्डाच्या सर्वोच्च परिषदेने बुधवारी मंजुरी दिली आहे.
बीसीसीआयच्या चार वेतन श्रेण्या ( BCCI four salary categories ) आहेत. ज्यामध्ये ए+ मधील खेळाडूंना 7 कोटी रुपये, तर ए, बी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे 5 कोटी, 3 कोटी आणि 1 कोटी रुपये मानधन म्हणून दिले जाते. त्यानुसार यंदा खराब फॉर्ममुळे पुजारा आणि रहाणे यांना आता बी ग्रेडमध्ये हलवण्यात आले आहे. जे आधी ए ग्रेडमध्ये होते. या दोन्ही खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतूनही वगळण्यात आले आहे.