मुंबई:दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉला रुग्णालयातून डिस्चार्ज ( Prithvi Shaw discharged from hospital ) देण्यात आला असून तो टायफॉइडमधून बरा झाल्यानंतर हॉटेलमध्ये परतला आहे. फ्रेंचायझीने रविवारी ही माहिती दिली. मागील काही सामन्याला सलामवीर पृथ्वी शॉ मुकला होता. आयपीएल 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन दिग्गज डेव्हिड वॉर्नरसह उर्वरित दोन लीग सामने खेळणार की नाही हे फ्रेंचायझीने सांगितले नाही.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी पंजाब किंग्जशी खेळेल, त्यानंतर 21 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध त्यांचा शेवटचा आयपीएल 2022 लीग सामना होईल. हा संघ सध्या 12 गुणांसह आयपीएल गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असून प्लेऑफच्या शर्यतीत आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Delhi Capitals opener Prithvi Shaw ) याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, जिथे त्याच्यावर टायफॉइडवरील उपचार सुरू होते, असे डीसीने रविवारी सकाळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शॉ हॉटेलमध्ये परतला आहे, जिथे तो वैद्यकीय देखरेखीखाली आहे. अलीकडे, दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन यांनी सूचित केले होते की, हा युवा फलंदाज उर्वरित सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता नाही. तसेच वॉटसन म्हणाला होता, आतापर्यंत त्याची अनुपस्थिती संघाचे नुकसान आहे. आशा आहे की तो लवकरच संघात परतेल.
पृथ्वी शॉने 1 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध डीसीचे शेवटचे तीन लीग सामने खेळू शकला नाही. 8 मे रोजी शॉच्या एका इंस्टाग्राम स्टोरीने उघड झाले की, सलामीवीर तापामुळे रुग्णालयात दाखल झाला होता. पृथ्वी शॉने नऊ सामन्यांमध्ये 28.78 च्या सरासरीने आणि 159.87 च्या स्ट्राइक रेटने 259 धावा केल्या आहेत. ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा -Ipl 2022 Gt Vs Csk : नाणेफेक जिंकून सीएसकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघाची अशी आहे प्लेइंग इलेव्हन