लीसेस्टर : अनेक दिवसांपासून लय शोधत असलेला भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने ( Former captain Virat Kohli ) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 67 धावांची आकर्षक खेळी केली. 1 बाद 80 अशी दिवसाची सुरुवात केल्यानंतर भारताने खेळ संपेपर्यंत 92 षटकांत 7 बाद 364 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने पहिला डाव 8 बाद 246 धावांवर घोषित केला, त्याला प्रत्युत्तरात लीसेस्टरशायरने 244 धावा केल्या होत्या.
कोहलीने 98 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला ( Jaspreet Bumrah bowling was caught ). कोहलीशिवाय अष्टपैलू जडेजा (56) आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (62) यांनी अर्धशतकांसह फलंदाजीचा सराव केला. या दोन्ही फलंदाजांनी मात्र बाद झाल्यानंतर पुन्हा फलंदाजी केली.