हैदराबाद:आयपीएलच्या पंधाराव्या हंगामात आतापर्यंत प्रत्येक संघाचा प्रत्येकी एक सामना झाला आहे. त्यानंतर बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) संघात आयपीएल 2022 चा सहावा सामना पार पडला. त्यामुळे फक्त या दोन संघाचे आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. त्यामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत देखील बदल झाले आहे. म्हणून गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे, ते आपण आज जाणून घेणार आहोत.
राजस्थान रॉयल्स पहिला क्रमांकावर कायम -रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यानंतरही गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स पहिला क्रमांकावर कायम ( Rajasthan Royals remain at number one ) आहे. पहिल्या सामन्यात मोठ्या विजयासह, राजस्थान रॉयल्सचा संघ 3.050 च्या सर्वोत्तम नेट रनरेटने पहिल्या स्थानावर उपस्थित आहे. त्याचबरोबर, दिल्ली कॅपिटल्स 0.914 च्या धावगतीने दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्जचा संघ तिसऱ्या स्थानावर कायम आहे. पंजाब किंग्जचा नेट रन रेट 0.697 आहे. तसेच आता केकेआर 5व्या स्थानावर घसरला आहे, तर गुजरात टायटन्सने चौथ्या स्थानावर मजल मारली आहे. गुजरात टायटन्सचा रन रेट 0.286 आणि केकेआरचा रन रेट 0.093 आहे.