महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 : चेन्नईच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर गुणतालिकेत बदल; पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपच्या दावेदारांबद्दल जाणून घ्या

आयपीएल 2022 मध्ये, पंजाब किंग्सने आयपीएलच्या 11 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 54 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. पंजाबचा हा दुसरा विजय ठरला. त्याचवेळी चेन्नईला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच आयपीएलच्या गुणतालिकेत ( Changes in IPL Point Table ) काही बदल देखील झाले आहेत. त्याचबरोबर पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपच्या दावेदारांमध्ये काही नवीन नावे समाविष्ट झाली आहेत.

By

Published : Apr 4, 2022, 5:30 PM IST

IPL Point Table
IPL Point Table

हैदराबाद:पंजाब किंग्सने रविवारी झालेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अकराव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा 54 धावांनी पराभव ( Punjab Kings won by 54 runs) केला. या सामन्यात सीएसकेला अष्टपैलू शिवम दुबेच्या ( All-rounder Shivam Dubey ) शानदार अर्धशतकानंतर ही, 181 धावांचा पाठलाग करताना 126 धावांवर सर्वबाद व्हावे लागले. त्यामुळे चेन्नई संघाला आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या सलग तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. तसेच त्यामुळे गुणतालिकेत देखील काही बदल झाले आहेत.

प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीला, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ( Liam Livingstone ) 32 चेंडूत 60 धावांच्या जोरावर पंजाब किंग्जने, 20 षटकांत 8 बाद 180 धावा करून चेन्नई सुपर किंग्जसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवले. राहुल चहर उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि पीबीकेएससाठी त्याने तीन बळी घेतले. पंजाबच्या या विजयानंतर आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपच्या ( Purple Cap and Orange Cap ) दावेदारांमध्ये एक नवीन नावही जोडले गेले आहे. चेन्नईने सलग तिसरा सामना गमावला आहे.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) सध्या चार गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) तिसऱ्या स्थानावर आहे, तर पंजाब किंग्ज कालचा सामना जिंकून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ ( Delhi Capitals ) पाचव्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) सहाव्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) सातव्या, मुंबई इंडियन्स (USI) आठव्या, CSK नवव्या आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) गुणतालिकेत तळाशी आहे.

ऑरेंज कॅपचे दावेदार (Orange Cap contenders )-

1. इशान किशन (मुंबई इंडियन्स) - 135 धावा

2. जोस बटलर (राजस्थान रॉयल्स) - 135 धावा

3. शिवम दुबे (सीएसके)- 109 धावा

4. लियाम लिव्हिंगस्टोन (पंजाब किंग्स) - 98 धावा

5. आंद्रे रसेल (केकेआर) - 95 धावा

पर्पल कॅपचे दावेदार (Purple Cap contenders )-

1. उमेश यादव (केकेआर)- 8 विकेट्स

2. राहुल चहर (पंजाब किंग्स) - 6 विकेट्स

3. युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स) - 5 विकेट्स

4. मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स) - 5 विकेट्स

5. टीम साऊदी (केकेआर)- 5 विकेट्स

हेही वाचा -Ipl 2022, Srh Vs Lsg: आज हैदराबादला पहिल्या विजयाची अपेक्षा, तर लखनौ संघाला कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details