बंगळुरु :भारत विरुद्ध श्रीलंका ( India vs Sri Lanka ) संघात दोन सामन्यांची मालिका सोमवारी पार पडली. सोमवारी पार पडलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने 238 धावांनी विजय मिळवला. तसेच श्रीलंकेला मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप दिला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मालिका विजयानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्याने जसप्रीत बुमराहचे कौतुक केले.
कर्णधार रोहित शर्मा आभासी पत्रकार परिषदेत ( Rohit Sharma Virtual Press Conference ) बोलताना म्हणाला, श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याचे (बुमराह ) प्रदर्शन शानदार होते. या सामन्यात जसप्रीत बुमराहने 47 धावा देताना 8 विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने प्रथमच मायदेशात कसोटी सामना खेळताना पाच विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. त्याची कामगीरी या खेलपट्टीवर उल्लेखणीय होती. कारण ही खेळपट्टी खासरकरुन फिरकी गोलंदाजांसाठी तयार करण्यात आली होती.
रोहित शर्मा पुढे म्हणाला, "बुमराहची कामगिरी शानदार ( Bumrah performance is fantastic ) होती, यात शंका नाही. अशा परिस्थितीत गोलंदाजी करणे, हे दाखवते की त्याच्याकडे किती कौशल्य आणि क्षमता आहे. बुमराहसारखी कोणतीही व्यक्ती कधीही खेळातून बाहेर होऊ शकणार नाही. परिस्थिती कशी ही असो, तो नेहमीच खेळात असतो. याचा कर्णधाराला गोलंदाजांना फिरवण्यात आणि प्रत्येक गोलंदाजाकडून सर्वोत्तम कामगिरी करण्यात खूप फायदा होतो. जेव्हा तुमच्याकडे बुमराहसारखा दर्जेदार खेळाडू संघात असतो, तेव्हा असे घडते."
शर्माने सांगितले की बुमराह वेगवेगळ्या परिस्थितीत कशी चांगली कामगिरी करू शकतो, मग ते मैदान मायदेशातील असो किंवा बाहेरचे