महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Asia Cup Host : यजमानपद वाचवण्यासाठी पाकिस्तानची कसरत, भारताला युएईमध्ये खेळण्याची ऑफर देण्याची शक्यता - बीसीसीआय

सप्टेंबरमध्ये होणार्‍या आशिया चषकाचे यजमानपद कायम राखण्यासाठी पाकिस्तान कसरत करत आहे. पाकिस्तान यजमान राहू शकतो आणि भारताला युएईमध्ये सामना खेळण्याची ऑफर दिली जाऊ शकतो.

pcb vs bcci
बीसीसीआय पीसीबी

By

Published : Feb 17, 2023, 10:53 AM IST

नवी दिल्ली :आशिया चषक कुठे होणार याबाबतचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेच्या मार्चमध्ये होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. या बैठकीनंतर आशिया कप कोणत्या देशात होणार हे स्पष्ट होणार आहे. जेव्हापासून बीसीसीआयने आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानला न पाठवण्याची घोषणा केली आहे, तेव्हापासून पाकिस्तानची अवस्था वाईट आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेतल्यास आर्थिक नुकसानाबरोबरच त्याची प्रतिष्ठाही खराब होईल.

भारताला युएईत सामने खेळणार? : आशिया चषकासंदर्भात आशिया क्रिकेट परिषदेची (ACC) बैठक ४ फेब्रुवारीला झाली. एसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत स्थळ बदलण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. सूत्रांच्या हवाल्याने अशी बातमी आहे की, पाकिस्तान यजमान राहू शकतो आणि भारताला युएईमध्ये सामना खेळण्याची ऑफर दिली जाऊ शकतो. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. जर भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला, तर अंतिम सामनाही यूएईमध्ये खेळवला जाईल.

द्विपक्षीय क्रिकेट बंद : भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय क्रिकेट खेळले जात नाही. या दोघांमधील संघर्ष जगातील इतर देशांमध्ये आयोजित आयसीसी स्पर्धांमध्ये होतो. आशिया कप 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने झाले. भारताने ग्रुप मॅच जिंकली होती. मात्र सुपर 4 मध्ये भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. 2023 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषकातही या दोघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता. ज्यामध्ये भारताने बाजी मारली होती.

आशिया चषकाची तारीख जाहीर नाही :जय शाह यांनी पुढील दोन वर्षांसाठी आशियाई क्रिकेटचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. यामध्ये आशिया चषकचा देखील समावेश आहे. मात्र आशिया चषक सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. श्रीलंका हा आशिया कपचा सध्याचा चॅम्पियन आहे. 2022 च्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला होता. भारत सात वेळा आशिया कपचा चॅम्पियन ठरला आहे. आशिया कपची 16 वी आवृत्ती 2023 मध्ये होणार आहे. ती कुठे होणार याबाबत साशंकता आहे. मात्र, आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानच्या हातून हिसकावले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा :Afridi on Asia Cup : बीसीसीआयसमोर आयसीसीही काही करू शकणार नाही - शाहिद आफ्रिदी

ABOUT THE AUTHOR

...view details