नवी दिल्ली : पाकिस्तानच्या 34 खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या व्हिसाला केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजुरी दिली आहे (The Union Home Ministry has approved visas for 34 Pakistani players and officials). आता पाकिस्तानी ब्लाईंड क्रिकेट संघाचा भारतात सुरू असलेल्या ब्लाईंड T20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, परराष्ट्र मंत्रालय पाकिस्तानी खेळाडू आणि अधिकाऱ्यांना व्हिसा जारी करेल जेणेकरून ते 5 ते 17 डिसेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. (Blind cricket world cup)
व्हिसा देण्यास मान्यता दिली :मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गृह मंत्रालयाने ब्लाईंड विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या 34 खेळाडू आणि अधिकाऱ्यांना व्हिसा देण्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी, पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट कौन्सिल (Pakistan Blind Cricket Council) ने मंगळवारी एक निवेदन जारी करून संघाला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून परवानगी मिळाली नसल्याचा दावा केला होता.