महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाकिस्तानच्या संघाला भारताची बी टीम पुरून उरेल; पाकच्या माजी खेळाडूचे मत

भारताची बी टीम पाकिस्तानच्या मुख्य संघाला नक्कीच सहज पराभूत करेल, असे पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने म्हटलं आहे.

pakistani cricketer Danish Kaneria claims even India B Team can beat Pakistan
पाकिस्तानच्या संघाला भारताची बी टीम पुरून उरेल; पाकच्या माजी खेळाडूचे मत

By

Published : Jul 23, 2021, 4:30 PM IST

मुंबई -पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचे कौतूक केले. यासोबत त्याने पाकिस्तान क्रिकेट संघाची टिंग्गल देखील उडवली.

शिखर धवनच्या नेतृत्वात युवा खेळाडूंचा भरणा असलेला दुसऱ्या फळीतील भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारताच्या या युवा संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या यशात दीपक चहर, पृथ्वी शॉ आणि इशान किशन यांनी चमकदार कामगिरी केली. यासोबत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली.

भारतीय युवा खेळाडूंची भूरळ दानिश कनेरियाला पडली आहे. त्याने भारताच्या या युवा खेळाडूंचे तोंडभरुन कौतूक केले. दानिश कनेरिया त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, 'ज्या पद्धतीने राहुल द्रविडने भारतीय संघासोबत काम केले, ते कौतूकास्पद आहे. द्रविडने कुलदीप यादवचा आत्मविश्वास वाढवला.'

पुढे बोलताना दानिश म्हणाला की, 'भारताची ही बी टीम पाकिस्तानच्या मुख्य संघाला नक्कीच सहज पराभूत करेल.'

दानिश कनेरियाचे भाकित -

भारतीय संघ टी-20 विश्वकरंडक स्पर्धेआधी निर्धारित षटकाचे सामने खेळणार नाही. पण आयपीएलच्या माध्यमातून ते चांगली लय कायम ठेवतील. मला वाटत की, टी-20 विश्वकरंडकाचा अंतिम सामना भारत आणि वेस्ट इंडिज या संघात होईल, असे भाकित दानिश कनेरियाने वर्तवले आहे.

हेही वाचा -हनिमून सोडून टेनिसपटू जोडपे ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या निर्धाराने टोकियोत दाखल

हेही वाचा -IND vs SL, 3rd ODI : भारताच्या पाच खेळाडूंचे वन डेत पदार्पण

ABOUT THE AUTHOR

...view details