महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Pakistan Vs Australia ODI : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा एकदिवसीय सामना, किम गर्थचे ऑस्ट्रेलियन संघाकडून पदार्पण - किम गर्थ

पाकिस्तानची महिला क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. ब्रिस्बेनमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडची माजी अष्टपैलू खेळाडू किम गर्थ ऑस्ट्रेलिया संघाकडून वनडे पदार्पण करेल.

Pakistan Vs Australia ODI
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान

By

Published : Jan 18, 2023, 8:49 AM IST

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघामधील दुसरी वनडे सध्या ब्रिस्बेनच्या ऍलन बॉर्डर फील्डवर सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानवर मालिका विजय मिळवण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या किम गर्थचे पदार्पण : आयर्लंडची माजी अष्टपैलू खेळाडू किम गर्थ ब्रिस्बेनमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून वनडे पदार्पण करेल. गर्थने गेल्या महिन्यात भारताविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेदरम्यान टी20 क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. ती ऑस्ट्रेलिया कडून वनडे क्रिकेट मध्ये पदार्पण करणारी 149 वी खेळाडू आहे. गार्थने ऑस्ट्रेलियन टीममध्ये मेगन शुटची जागा घेतली आहे. कर्णधार मेग लॅनिंग आणि नवोदित फोबी लिचफिल्ड यांच्या अर्धशतकांसह बळावर यजमानांनी सोमवारी पाकिस्तानवर आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह त्यांनी तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हेही वाचा :Women IPL Media Rights : महिला आयपीएलच्या मीडिया हक्कांचा लिलाव ; 'इतक्या' कोंटींना विकले गेले हक्क

सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र : 26 वर्षीय गार्थने 2010 ते 2018 दरम्यान आयर्लंडसाठी 34 एकदिवसीय सामने खेळले आहेत. गर्थ गेल्या सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरली आणि WNCL आणि WBBL या दोन्हींमध्ये तिच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे राष्ट्रीय निवडकर्त्यांनी तिला डिसेंबरच्या भारत दौऱ्यासाठी बोलावले होते. दक्षिण आफ्रिकेत पुढील महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ त्यांच्या महत्वाच्या खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटच्या दृष्टीने काम करतो आहे.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन : बेथ मूनी (विकेटकीपर), फोबी लिचफिल्ड, मेग लॅनिंग (सी), एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, अॅशलेग गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, अलाना किंग, किम गर्थ, डार्सी ब्राउन पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन : मुनीबा अली, सिद्रा अमीन, बिस्माह मारूफ (क), ओमामा सोहेल, निदा दार, आलिया रियाझ, कैनत इम्तियाज, फातिमा सना, सिद्रा नवाज (विकेटकीपर), डायना बेग, सादिया इक्बाल पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका :1) सोमवार १६ जानेवारी - ऑस्ट्रेलिया आठ गडी राखून जिंकला (DLS पद्धत) 2) बुधवार 18 जानेवारी - अॅलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन 3) शनिवार 21 जानेवारी - नॉर्थ सिडनी ओव्हल

हेही वाचा :India Open 2023 इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात, या दिग्गज खेळाडूंवर असेल सगळ्यांची नजर

ABOUT THE AUTHOR

...view details