कराची - पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने पाकिस्तान क्रिकेट संघाबाबत मोठं भाष्य केलं आहे. त्याने, पाकिस्तान संघ लवकरच क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये प्रथम किंवा दुसर्या क्रमांकावर असेल. पाकिस्तानच्या संघाने तिन्ही फॉर्मेटमध्ये त्यांचा खेळ सुधारला असून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत सुधारणा झाली आहे, असे म्हटलं आहे.
रझाक म्हणाला, 'दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि इंग्लंड यांसारख्या संघांकडे पाहावे लागेल, जे आत्ता आपल्यासारखे संघ बनवत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ कसा कमकुवत झाला, हे आपण पाहिले आहे. परंतु पाकिस्तानचा संघ त्या स्थितीत नाही. आमची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत सुधारणा झाली आहे.'