महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतीयांसाठी शोएब अख्तरने केली प्रार्थना, म्हणतो 'आपण सर्व एकत्र आहोत' - shoaib akhtar

शोएब अख्तरने भारतातील लोकांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. या संदर्भात त्याने ट्विट केले आहे.

pakistan-former-fast-bowler-shoaib-akhtar-extends-his-support-to-indian-amid-covid-19-crisis
शोएब अख्तरने केली प्रार्थना, म्हणतो 'आपण सर्व एकत्र आहोत'

By

Published : Apr 24, 2021, 6:29 PM IST

Updated : Apr 24, 2021, 7:19 PM IST

मुंबई - भारतात कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. देशात दररोज रेकॉर्डब्रेक कोरोना रूग्णाची भर पडत आहे. मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत असल्याने, रुग्णालयात बेड्सची कमतरता जाणवत आहे. दिल्ली असो की महाराष्ट्र अशी विदारक स्थिती प्रत्येक ठिकाणी आहे. भारतात ऑक्सिजन पुरवठ्याचा तुटवडा आहे. अशा संकटकालीन काळात पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय लोकांसाठी प्रार्थना केली आहे.

अख्तरने भारतातील लोकांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. या संदर्भात त्याने ट्विट केले आहे. यात तो म्हणतो, 'भारतीय नागरिकांसाठी मी प्रार्थना करतो. मला आशा आहे की, लवकरच गोष्टी नियंत्रणात येतील. भारताचे सरकार हे संकट अधिक चांगल्या प्रकारे हाताळेल. आपण सर्व यात एकत्र आहोत.'

दरम्यान, शोएबच्या आधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील ट्विट करत भारतीय लोकांसाठी प्रार्थना केली आहे. 'कोरोनाच्या संकटात सापडलेल्या भारतातील नागरिकांच्या संवेदना मी समजू शकतो. या कोरोनामुळे पीडित शेजारी आणि जगभरातील लोकांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. ते लवकर बरे व्हावे. माणुसकीच्या नात्याने या जागतिक संकटाला तोंड देणे आवश्यक आहे, अशा आशयाचे ट्विट इम्रान खान यांनी केलं आहे.

हेही वाचा -RR VS KKR : राजस्थान-कोलकातामध्ये आज लढत

हेही वाचा -B'day Special: 'ईटीव्ही भारत'चा सचिनच्या वाढदिवसानिमित्त खास आढावा

Last Updated : Apr 24, 2021, 7:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details