मुलतान: कर्णधार बाबर आझमच्या विक्रमी 17व्या शतकाच्या ( Babar Azam record 17th century ) जोरावर पाकिस्तानने बुधवारी कडाक्याच्या उन्हात पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्यात वेस्ट इंडिजचा पाच विकेट्सनी पराभव ( Pakistan Beat West Indies by 5 wickets ) केला. बाबरने 107 चेंडूत 103 धावा केल्या. त्याचबरोबर गेल्या पाच एकदिवसीय सामन्यांमधील त्याचे चौथे शतक आहे. ज्यामुळे पाकिस्तानने चार चेंडू बाकी असताना 5 बाद 306 धावा केल्या आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
वेस्ट इंडिजविरुद्ध धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय -
बाबरने इमाम-उल-हक (65) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारीही केली. डावखुरा फलंदाज खुशदिल शाह काही वेळा धावबाद होण्यापासून बचावला. त्याने अखेरीस वेगवान गोलंदाजांना चार षटकार खेचून 23 चेंडूत 41 धावा करून नाबाद राहिला. वेस्ट इंडिजविरुद्ध धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय ( Pak biggest win chase against WI ) आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून 42 अंश सेल्सिअस तापमानात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि यष्टिरक्षक आणि सलामीवीर शाई होपने 134 चेंडूत केलेल्या 127 धावांच्या जोरावर 8 बाद 305 धावा केल्या.