कराची :सद्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका ( A three-match Test series ) खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना देखील अनिर्णीत राहिला. पाकिस्तानचे फलंदाज बाबर आझम ( Batsman Babar Azam ), अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्यांच्या दुसऱ्या डावात विक्रमी 172 षटके खेळून अनिर्णीत राखला.
कर्णधार आझमच्या 196, शफीकच्या नाबाद 96 आणि रिजवानचे नाबाद 104 धावांच्या जोरावर पाकिस्तान सामना ड्रॉ केला. त्यामुळे या दोन संघातील तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. पहिले दोन्ही सामने अनिर्णीत राहिल्याने बेनौद-कादिर ट्रॉफीमध्ये ( Benaud-Qadir Trophy ) अद्याप कोणीही आघाडी घेतलेली नाही.
दुसऱ्या डावातील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी केलेल्या आझमने दोन दिवसांत 10 तासांपेक्षा जास्त वेळ फलंदाजी करून पाकिस्तानला पराभवापासून वाचवले ( Saved Pakistan from defeat ). पाचव्या दिवशी उरलेल्या 12 षटकांपूर्वीच बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला आशेचा किरण मिळाला. पण नाबाद असलेल्या रिझवानने यजमानांना सामन्यात रोखून धरले आणि त्याने आपले शतक झळकावत ऑस्ट्रेलियाला दुसऱ्यांदा विजयापासून दूर ठेवले.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 506 धावांच्या विशाल लक्ष्यापासून फक्त 63 धावा दूर असताना पाकिस्तानच्या चाहत्यांनी, त्यांच्या दुसऱ्या डावात 443/7 धावा झाल्यामुळे स्टँडवर आनंद व्यक्त केला. ऑस्ट्रेलियाला 12.3 षटकात सहा विकेट्सची गरज असताना, नॅथन लियॉन (4/112) यांनी सुरेख गोलंदाजी करत आणखी दोन झटपट विकेट घेतल्याने पाकिस्तानचा डाव 414/7 असा झाला.