लाहोर : रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. पीसीबीने या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. त्याचबरोबर 5 राखीव खेळाडू देखील निवडण्यात आले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात (Statement of Pakistan Cricket Board) म्हणले आहे की, सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये समाविष्ट नसलेले खेळाडू 16 फेब्रुवारी रोजी कराची येथील नॅशनल स्टेडियमवर प्रशिक्षण शिबिरात (Training camp at Karachi National Stadium) सहभागी होतील. रावळपिंडीतील पहिल्या कसोटीनंतर, कराची (मार्च 12-16) आणि लाहोर (मार्च 21-25) अनुक्रमे दुसरी आणि तिसरी कसोटी आयोजित केली जाईल.
ते पुढे म्हणाले, "आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या घरच्या मालिकेसाठी सातत्येचा पर्याय निवडला आहे आणि आवश्यकतेनुसारच बदल केले गेले आहेत. ज्या ठिकाणी बिलकुल आवश्यक आहे. या खेळाडूंना आत्मविश्वास देणे, दीर्घ हंगामातील त्यांच्या प्रभावी कामगिरीबद्दल त्यांना बक्षीस देणे आणि 2022 मध्ये भविष्यासाठी तयार करणे हे महत्त्वाचे आहे.
मुख्य निवडकर्ता मुहम्मद वसीम (Chief selector Muhammad Wasim) म्हणाले, हे देशांतर्गत पातळीवरील सर्वात प्रतिभावन खेळाडू आहेत. मला विश्वास आहे की, ते ऑस्ट्रेलिया सारख्या मजबूत संघाविरुद्ध शानदार कामगिरी करतील. पीसीबीने आणखी पुष्टी केली आहे की सकलेन मुश्ताक पुढील 12 महिन्यांसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहणार आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट यांची 12 महिन्यांसाठी वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक आणि पाकिस्तानचे माजी फलंदाज मोहम्मद युसूफ यांची ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.