लाहोर: इंग्लंड ( PAK vs ENG ) यांनी रविवारी सातव्या आणि निर्णायक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 67 धावांनी विजय मिळवला ( England defeated Pakistan by 67 runs ). त्याचबरोबर 17 वर्षांतील पहिला पाकिस्तान दौरा विजायने संमाप्त केला. इंग्लंडने मालिका 4-3 ने जिंकली ( England won the series against Pakistan 4-3 ). डेव्हिड मलान (47 चेंडूत नाबाद 78) याने मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले आणि हॅरी ब्रूकने 29 चेंडूत नाबाद 46 धावा करत संघाची धावसंख्या तीन बाद 209 पर्यंत नेली.
पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांनी या दोघांचे तीन झेल सोडले, ज्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. मलानने आपल्या खेळीत आठ चौकार आणि तीन षटकार मारले तर ब्रुकने चार षटकार आणि एक चौकार लगावला. त्याचवेळी सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहत्यांनी इंग्लंड संघावर प्रेमाचा वर्षाव ( Pakistani fans shower love on England team ) केला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
लक्ष्याचा पाठलाग करताना, पाकिस्तानने पहिल्या दोन षटकांत मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan ) (01) आणि कर्णधार बाबर आझम ( Captain Babar Azam ) (04) हे दोन्ही सलामीवीर गमावल्यामुळे संघाला लक्ष्यही गाठता आले नाही. अखेरीस ते आठ बाद 142 धावा करू शकले. मलान आणि ब्रूक या दोघांचा झेल सोडणाऱ्या बाबरने ख्रिस वोक्सच्या पहिल्याच षटकात (26 धावांत 3 बळी) कव्हरवर एक सोपा झेल दिला, तर रीस टोपली (34 धावांत 1 बळी) रिजवानला बोल्ड केले.
शान मसूदची 43 चेंडूत 56 धावांची सुरेख खेळी -
पाकिस्तानकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शान मसूदने इंग्लंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर 43 चेंडूत 56 धावांची सुरेख खेळी केली. पण वोक्सशिवाय, डेव्हिड विली (22 धावांत दोन विकेट), सॅम कुरन (27 धावांत एक विकेट) आणि टोपले यांच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचे इतर फलंदाज खेळू शकले नाहीत. इंग्लंडचा नियमित टी-20 कर्णधार जोस बटलरने या दौऱ्यावर एकही सामना खेळला नाही. त्याने त्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याचे पुनर्वसन सुरू ठेवले.
नाणेफेक हारून फलंदाजी स्वीकारल्यानंतर फिल सॉल्ट (20) आणि अॅलेक्स हेल्स (18) या सलामीच्या जोडीने पुन्हा एकदा 39 धावा जोडून वेगवान सुरुवात केली. दोघे मात्र पाचव्या षटकात तीन चेंडूत पॅव्हेलियनमध्ये परतले. हेल्सला मोहम्मद हसनैनने (32 धावांत 1 बळी) झेलबाद केले, तर शादाब खानच्या ( Shadab Khan ) अचूक थ्रोवर सॉल्टने एका चेंडूनंतर त्याची विकेट गमावली. रिझवानकडून धावबाद होण्यापूर्वी बेन डकेटने 19 चेंडूत 30 धावा केल्या.
पाकिस्तानचे खराब क्षेत्ररक्षण -
पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत डेव्हिड मलान ( David Malan ) आणि ब्रुक यांनी 61 चेंडूत 108 धावांची अखंड भागीदारी रचली. 20 धावांपर्यंत पोहोचल्यानंतर बाबरने दोन्ही फलंदाजांना जीवदान दिले, तर मलानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मोहम्मद वसीमनेही त्याचा झेल सोडला. वसीम चांगलाच महागात पडला. त्याने चार षटकांत 61 धावा दिल्या, जे पाकिस्तानसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिसरे सर्वात महागडे षटक ठरले.
हेही वाचा -Ind Vs Sa Odi Series : वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; शिखर धवनकडे संघाची धुरा, 'या' नवीन चेहऱ्यांना मिळाली संधी