हैदराबाद:पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Pakistan vs Australia ) संघात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात एक घटना अशी घडली आहे की, ज्यामुळे डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन आफ्रिदी ( David Warner and Shaheen Afridi ) सोशल मीडियावर मोठ्या ट्रोल होत आहे. तसेच या दोघांचा एकमेकांना खुन्नस देत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी त्यांचा हा व्हिडिओ एडिट करुन अपलोड केला आहे, तो देखील तितकाच व्हायरल होत आहे.
वास्तविक ही घटना तेव्हाची आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ( Australia second innings ) शाहीन आफ्रिदीने डेव्हिड वॉर्नरला एक चेंडू टाकला, ज्यावर वॉर्नरने बचाव केला. परंतु फॉलो-थ्रू पूर्ण केल्यानंतर शाहीन आफ्रिदी थेट डेव्हिड वॉर्नरकडे गेला आणि त्याला खुन्नस देऊ लागला. यानंतर दोघेही एकमेकांच्या बाजूला उभे राहिले आणि नंतर हसत हसत पुढे गेले. मात्र दोघांचा हा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांनी या दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.