ऑकलंड : आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women World Cup ) स्पर्धेला चार मार्च पासून सुरुवात होणार आहे. यंदा आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा न्यूझीलंड येथे आयोजित केले गेली आहे. या अगोदर पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह मारूफला ( Pakistan captain Bismah Maroof ) वाटते की, त्यांचा संघ 4 मार्चपासून सहा ठिकाणी खेळल्या जाणार्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. त्याचबरोर बिस्माह म्हणाली की, त्यांच्या संघासाठी ही चांगली संधी असणार आहे.
कर्णधार बिस्माह मारूफ शुक्रवारी आयसीसीला म्हणाली ( Bismah Maruf told the ICC ), ''महिला विश्वचषक हा असा एक मंच आहे, जिथे तारे जन्माला येतात आणि हा अंतिम टप्पा आहे. जिथे क्रिकेटपटू आपला वारसा कायमचा सोडू शकतात. महिला विश्वचषक ही पाकिस्तानसाठी मोठी संधी आहे.''